Home स्टोरी मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे लाखे वस्ती समाजाने अजून २५ घरांची केली मागणी.

मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे लाखे वस्ती समाजाने अजून २५ घरांची केली मागणी.

135

सावंतवाडी प्रतिनिधी: शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपालिका मुख्य अधिकारी साळुंखे यांना निवेदन देऊन अजून पंचवीस घरांची मागणी करण्यात आली.

निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,लाखेवस्तीमध्ये राखीव जागेत 25 घरे बांधून मिळावित.गेली 15 वर्षे सदरच्या वस्तीमध्ये घराशिवाय लोक राहत आहेत, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. सध्या स्थितीमध्ये लाखेवस्तीतील एका कुटुंबामध्ये दोन कुटुंबापेक्षा अधिक लोक राहत आहेत त्यामुळे सदरच्या घरामध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये घरांच्या सिलिंग मधून पावसाच्या पाण्याचे गळतीच प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरच्या घरांमध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा पाठपुरवठा आम्ही नगरपरिषद कडे केला असता वेळोवेळी नगरपालिकेकडून फक्त आश्वासने देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी लाखे वस्तीमध्ये येऊन पहानि केली. तेव्हा लाखे वस्ती समाजाकडून शालेय मंत्री दीपक भाई केसरकर यांना निवेदन देण्यात आले त्याचवेळी केसरकर यांनी मुख्याधिकारी साळुंखे यांना नवीन 25 घर बांधणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाकेवस्तीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.

याप्रसंगी लाखे वस्ती समाजातील व श्री रासाई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जगन्नाथ लाखे, सुनील लाखे, संजय खोरागडे, अंकुश लाखे, रोहित लाखे, नितेश पाटील, सागर लाखे, राम लाखे, साई लाखे, लखन पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, प्रभू पाटील विकी लाखे, अविनाश खोरागडे उपस्थित होते.