Home राजकारण मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर! अंबादास दानवे यांनी शिंदे...

मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर! अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला….

195

२ जुलै वार्ता: महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज शपथ घेतली. यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेमध्ये फूट पाडताना शिंदे गटाने एक मोठं कारण दिलं होतं, ते म्हणजे अजित पवारांविषयी असलेली नाराजी. अजित पवार कामासाठी निधी देत नाहीत, आणि उद्धव ठाकरे आपल ऐकत नाहीत अशी शिंदे गटाची तक्रार होती. मात्र, आता तेच अजित पवार भाजपसोबत आले असल्यामुळे दानवे यांनी ‘आता कोणाला दोष देणार?’ असा सवाल शिंदे गटाला विचारला आहे. “मला त्या ४० जणांच्या गँगची कीव येते. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..!” अशा आशयाचं ट्विट दानवे यांनी शिंदे गटाला उद्देशून केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी!” असं दानवे म्हणाले.