Home स्टोरी मंगेश तळवणेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल..! खासदार नारायण राणे

मंगेश तळवणेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल..! खासदार नारायण राणे

133

सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा परिषद चे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांना खासदार नारायण राणे यांनी खास शुभेच्छा देत जिल्हा परिषद महायुतीची सत्ता आल्यावर श्री मंगेश तळवणकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल. असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे श्री तळवणेकर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात जिल्हा परिषद मध्ये पाहायला मिळणार आहेत. श्री मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या भागाच्या विकासासाठी आपण मैदानात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज रविवारी कणकवली येथे खासदार नारायण राणे यांनी त्यांना खास निमंत्रित केले. आणि त्यांची समजूत काढली आहे.

श्री रमंगेश तळवणेकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. सामाजिक क्षेत्रात व राजकारणात त्यांनी भरीव असे काम केले आहे. त्यामुळे त्यांना एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्हा परिषदच्या स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती केली जाईल. हे आश्वासन दिल्यानंतरच मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी मागे घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर उपस्थित होते.