Home स्टोरी भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! –...

भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू*

104

मुंबई:  ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन केले आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही त्यांना ३० ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत, अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.आमदार बच्चू कडू या वेळी म्हणाले, ‘‘भारतरत्न’ सन्मानप्राप्त व्यक्तीने कुठली विज्ञापने करावीत किंवा करू नयेत, याविषयी काही आचारसंहिता आहे. केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू. या प्रकरणी आम्ही ३० ऑगस्ट या दिवशी आंदोलनाची दिशा स्पष्ट करू.’’ नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनातही बच्चू कडू यांनी ‘भारतरत्न प्राप्त झालेल्या व्यक्तीने ‘ऑनलाईन’ जुगाराचे विज्ञापन करू नये’, अशी भूमिका मांडली होती.