Home स्टोरी भुसे सावे अयशस्वी भुजबळांनी नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावावा! संदीप...

भुसे सावे अयशस्वी भुजबळांनी नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावावा! संदीप जगताप यांची मागणी

130

नाशिक: नाशिक येथे गेले ३९ दिवसापासून नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष संदीप जगताप व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी घेतली. यावेळेस मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावण्यात पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे हे अयशस्वी झाले. शेतकऱ्यांचा त्यांनी भ्रमनिरास केला. आता नवीन कॅबिनेट मंत्री झालेले नाशिक जिल्ह्याचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. अशी अपेक्षा संदीप जगताप यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या जाचक कर्ज वसुलीच्या विरोधात अनेक वेळेस आंदोलने झालित. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा केला. या बिऱ्हाड मोर्चात नवीन ओटीएस योजना देण्याचे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. परंतु या गोष्टीला सहा महिने उलटून गेले तरी सरकारने यावर ठोस उपाययोजना केली नाही. राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची वारंवार आठवण करून दिली. प्रत्येक वेळेस हा प्रश्न मार्गी लावून असा शब्द सरकारने दिला. पण तो पाळला नाही. यामध्ये पालकमंत्री म्हणून दादा भुसे व सहकार मंत्री म्हणून अतुल सावे अयशस्वी झाले. त्यामुळे गेली 39 दिवस नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीवाडी सोडून इथ बसण्याची वेळ आली आहे. म्हणून आता नवीन कॅबिनेट मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. अशी अपेक्षा बोलताना संदीप जगताप यांनी व्यक्त केली.

संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

या प्रसंगी निवृत्ती गारे पाटील व आंदोलक शेतकऱ्यांचे नेते भगवान बोराडे, सागर गवळी उपस्थित होते.प्रतिक्रिया – छगन भुजबळ यांची प्रतिमा शेतकरी व बहुजन समाजाच्या विकासासाठी झटणारा नेता अशी आहे. नुकतेच ते मंत्रिमंडळात सहभागी झालेत. ते हेविवेट नेते आहे .नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे . यापूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देऊन देखील सरकारने ते पाळले नाही. म्हणून सरकारची प्रतिमा नाशिक जिल्ह्यात मलीन झाली आहे. ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मार्ग काढावा. व नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ही आमची अपेक्षा आहे.

संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना