शिर्डी: एका भावानेच आपल्या बहिणीची डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली. बहिणीचे प्रेमसंबंध असल्याने भावाला राग अनावर झाल्याने त्याने सख्ख्या बहिणीची हत्या केली. आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध समजल्यावर भाऊ आणि तिच्यात वाद झाला. याचे रुपांतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने भावाने सख्ख्या बहिणीच्या डोक्यात थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक टाकला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपीस येवला आणि शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुधाळ करत आहेत.