Home राजकारण भारत विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार...

भारत विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आहेत…! नारायण राणे.

126

२० एप्रिल वार्ता: भारत विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आहेत व ४०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा यासाठी मला निवडून द्या. किमान अडीच लाखांनी विजय मिळवायचा आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी काल अखेरच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. राणे म्हणाले, ”आज हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मला पाठिंबा, शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे. भाजपने उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे.