Home क्राईम भारतीय महिलेला “ओमानमध्ये” सुनावण्यात आली फाशीची शिक्षा….

भारतीय महिलेला “ओमानमध्ये” सुनावण्यात आली फाशीची शिक्षा….

301

देश विदेश: केरळमधील महिला नर्स निमिषा प्रिया हिला ओमानमध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा टाळण्यासाठी निमिषाने तिथल्या सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला पण निमिषाचा हा अर्जही सुप्रीम कोर्टाने फेटाळला आल्याचे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. निमिषा प्रियावर ओमान येथील नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. ओमानच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आता आता निमिषाच्या आशा तिथल्या राष्ट्रपतींच्या कोर्टात आहेत.

निमिषा प्रिया ही केरळमधील रहिवाशी आहे. तिने ओमानमध्ये जाऊन क्लिनिक सुरु केले. तिथे तिची अब्दो महंदी नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली, ज्याने तिला क्लिनिक सुरु करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची मदत मिळाल्याने निमिषाने तिचे क्लिनिक सुरु करण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर महंदीने निमिषाचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच निमिषा ही त्याची दुसरी पत्नी असल्याचा दावा करु लागला. महंदीने निमिषाकडून पैसेही मागितले. निमिषाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर महंदी काही दिवस तुरुंगातच राहिला. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने निमिषाचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतला.

 

महंदीकडून पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने त्याला भूल देण्याचे ऍनेस्थेटिक इंजेक्शन दिले. परंतु, इंजेक्शनचा ओव्हरडोज झाला आणि मेहंदीचा मृत्यू झाला. यानंतर प्रिया आणि तिचा सहकारी हनान जो ओमानचा नागरिक आहे, यांनी मिळून मेहंदीच्या मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकून दिले.याप्रकरणी निमिषाला २०१८ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर, हनानला जन्मठेपेची शिक्षा झाली.