Home स्टोरी भारतातील पहिल्या ‘फिश थीम पार्कचे’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदघाट्न!

भारतातील पहिल्या ‘फिश थीम पार्कचे’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदघाट्न!

159

सावंतवाडी: भारतातील पहिलं फिश थीम पार्क  सिंधुदुर्ग जिल्ह्याला उभारण्यात आलं आहे.सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत.

या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था आणि छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव घेता येणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे प्रकारच्या जातीचे मासे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. गोड्या पाण्यातील मासे, खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे या फिश थीम पार्कमध्ये पाहायला मिळणार आहेत.