मालवण: ज्या किल्ल्याचे भूमिपूजन आणि वास्तुशांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली अशा एकमेव मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर महिन्यात भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा हे आम्हालाही अपेक्षित आहे, परंतु केंद्र सरकारला किल्ले सिंधुदुर्गवर तो पुतळा उभारणे शक्य होत नसेल तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपुजन केले त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, मात्र नौदलाच्या या कार्यक्रमात सत्तारूढ भाजपने राजकारण आणू नये, तसेच हा कार्यक्रम आम्ही करीत असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून जे दाखविले जात आहे ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया मनसेचे राज्यनेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
Home स्टोरी भारताच्या नौदलाने आयोजित केलेल्या नौदल दिन कार्यक्रमाचे मनसे कडून स्वागतच! परशुराम उपरकर…