११ ऑक्टोबर वार्ता: भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शाहिद लतीफ हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता