Home स्टोरी भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

भारताकडून पाकिस्तान वर ९ ठिकाणी मिसाईल हल्ला..!

45

७ मे वार्ता: रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मिसाईल हल्ला केला आहे. पाकिस्तानने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता. त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओके मध्ये या ९ ठिकानांवर हल्ले केले आहेत.१. बहावलपूर,२. मुरीदके,३. गुलपुर,४. भीमबर,५. चकअमरू, ६ बाग, ७. कोटली,८. सियालकोट.९ मुजफ्फराबाद