Home स्टोरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी.

87

सावंतवाडी प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख किशोर जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनायक गुरव, पांडुरंग जाधव, सिद्धांत कदम, चंदन जाधव, मोरेश्वर जाधव, भिकाजी कदम, विजय नेमळेकर, विशाल जंगम, गणेश जाधव, रोहन जाधव, अंकुश कदम कांचन जाधव, भक्ती जाधव दीपक जाधव, विष्णू जाधव उपस्थित होते.

यावेळी किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष, धर्म, जातीसाठी महान कार्य केल्याचे सांगून याचे भान सर्वांनी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नसून ज्ञानाची संपत्ती असलेले विचार अंत त्यांनी दिलेल्या सर्व समावेशक विचारांची गरज आज देशाला असल्याचे सांगितले.

यावेळी विनायक गुरव यांच्याहस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला तर किशोर जाधव यांच्याहस्ते गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग जाधव यांनी तर आभार व मोरेश्वर जाधव यांनी मानले.