Home स्टोरी भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत!

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत!

232

मसुरे प्रतिनिधी: मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत या कुटुंबियांना पाठवून दिली. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सदर तातडीची आर्थिक मदत मसुरे कावावाडी येथे येत किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांच्या जवळ दिली. भारतीय जनता पक्ष व भाजप नेते डॉ. निलेश राणे तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी या कुटुंबियांना दिला. यावेळी संतोष गावकर, देवेंद्र हडकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, सचिन पाटकर, यशवंत हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर आदी उपस्थित होते. तातडीच्या मदती बद्दल किरण पाटील तसेच इतर आपत्तीग्रस्तांनी आभार मानले.