Home स्टोरी भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा!

भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा!

228

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांची प्रतिक्रिया….

 

मसुरे प्रतिनिधि: 

 

भाजपा नेते निलेश राणे यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णया विरोधात भाजपात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्य स्थितीत भाजप पक्षाला निलेश राणे यांच्या नेतृत्वाची मालवण कुडाळ मतदार संघाला गरज आहे. संघटनात्मक बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे या मतदार संघात चालू आहे. भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत त्यामुळे माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी राजकारणातून सन्यास घेण्याच्या आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे अशी प्रतिक्रिया भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी व्यक्त केली आहे.

भाजप नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील जाहीर केलेली एक्झीट ही त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. यामध्ये निलेश राणे यांच्या मोठा पाठपुरावा आहे. मतदारसंघात भाजप साठी पोषक वातावरण निर्माण झालेले असताना निलेश राणे यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण निलेशजी राणे हे आपला निर्णय मागे घेतील आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना तशी विनंतीही करणार असल्याचे बाळा गोसावी यांनी म्हटले आहे.