मागच्या निवडणुकीत पोल्ट्री व्यावसायिकांना माणगाव खोऱ्यात स्लॉटर हाऊस आणण्याचे आश्वासन भाजप ने दिले होते-आम्ही अजून स्लॉटर हाऊस शोधतोय….
कुडाळ प्रतिनिधी: विशाल परब यांनी २९ जून २०२० ला दुपारी 3 वाजता राधाकृष्ण हॉलला सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत बैठलं लावली होती त्यानंतर स्लॉटर हाऊस साठी विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री यांनी राणेंची भेट घेतली होती,त्यानंतर विशाल परब त्या विषयासाठी प्रयत्न देखील करताना दिसले नाही ते आता कालच्या पोल्ट्री व्यावसायिकांच्या बैठकीत दिसले.रॉयल फूड ने अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे त्यांच्या कष्टाचे पैसे दिले नाहीत,दरवाढ हा पुढचा विषय आहे,निवडणूक आली की अशाप्रकारे बैठका आयोजित करून लोकांना वेड्यात काढण्याचे प्रकार चालू आहेत,दरवाढीपेक्षा इन्ट्रीग्रेटरचे रॉयल फूड ने त्यांचे पैसे द्यावेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त माणगाव खोऱ्यात पोल्ट्री व्यावसायिक आहेत,सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोक कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय करतात. गेल्या निवडणूकित घोषित केलेला स्लॉटर हाऊस आम्ही अजूनही शोधतोय आता हे शोधकार्य CBI कडे द्यावे लागेल अस वाटतय.
कोरोना काळांत अनेक पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते,अनेक लोक कर्ज बाजारी झाले.त्याना फिरकून कोणी बघितलं नाही,आता निवडणूका जवळ आल्या बरोबर पोल्ट्री व्यावसायिक आठवलेत. केंद्रात भाजपची सत्ता मग पोल्ट्री व्यावसायिक यांची कर्ज माफ का केली नाहीत ?जिल्हा बँक भाजपकडे मग किती पोल्ट्री व्यावसायिकाना कर्ज वाटप केलात,किती अनुदान दिलात कोरोना काळात किती कर्ज माफ केलात फक्त निवडणूक आल्या की आठवण येते सर्वसामान्य माणसांची.अडचणीच्या काळात आमदार वैभवजी नाईकच पाठीशी उभे राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक आमंदार वैभवजी नाईक यांच्या पाठीशी उभे राहतील असा ठाम विश्वास आहे.