Home स्टोरी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने माडखोल...

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने माडखोल गावाला रुग्णवाहिका प्रदान

30

सावंतवाडी (माडखोल): माडखोल पंचक्रोशी परिसरात रुग्णवाहिके अभावी होणारी गैरसोय ओळखून या भागातील जनतेच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका दाखल करण्यात आली आहे. माडखोल पंचक्रोशीच्या आपण नेहमीच पाठीशी असून जनतेशी ही बांधिलकी आपण कायम ठेवणार असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

माडखोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी मंगळवारी विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका प्रदान केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे मानकरी दत्ताराम राऊळ, चंद्रकांत म्हालटकर, उपसरपंच जीजी राऊळ, माजी सरपंच संजय राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सैनिक बँकेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, केतन आजगावकर, पप्पू गावडे, स्वप्निल राऊळ, अमित राऊळ, बंटी सावंत, रवी चव्हाण, शैलेश माडखोलकर गावडे सायली शिरवणकर, निशा शिरवणकर, श्रेया पानोळकर, तेजस्विनी पानोळर आदीसह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ, महिला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र विशाल परब यांचे आदर्श असलेले प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांचे मागच्या आठवड्यात निधन झाल्यामुळे आपला वाढदिवस थाटात साजरा न करता रतन टाटांना अभिप्रेत असलेले विविध जनहिताचे उपक्रम राबवण्याचे विशाल परब यांनी जाहीर केले होते. तसेच कार्यकर्त्यानाही बॅनर बाजी तसेच केक कापणे, पुष्पगुच्छ प्रसार माध्यमांना जाहिराती न देण्याचे आवाहन केले होते.

या रुग्णवाहिकेवर गावातीलच स्वप्निल ऊर्फ बंटी सावंत यांची चालक म्हणून नेमणूक करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची गरज भासल्यास त्यांच्या या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

यावेळी विशाल परब यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने राबवलेल्या विविध समाजपयोगी उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.