Home स्टोरी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांचा तुळस गावात शाल श्रीफळ...

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांचा तुळस गावात शाल श्रीफळ देऊन सत्कार.

393

वेंगुर्ला: भाजपकडून माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांना प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रथमेश तेली हे सावंतवाडी मतदारसंघात वडिलांसोबत पक्षीय काम करत व्यवसाय सांभाळत होते. त्यातूनच त्यांनी लोकसंपर्क व विशेषतः युवकांचा संपर्क वाढवला. प्रथमेश तेली यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य तसेच जनसंपर्क यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमेश तेली यांची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रथमेश तेली यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली

आज बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी वेंगुर्ला तुळस  गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी तुळस गावातील कुंभारवाडी येथील भाजप चे कार्यकर्ते आणि गावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी तुळस कुंभारवाडी यांच्या वतीने प्रथमेश तेली यांचे सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वेश तेली, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, मारुती दोडणशट्टी, आशिष कुंभार,  विलास कुंभार, तेजस कुंभार, विष्णू कुंभार, भगवान कुंभार, शिवराज कुंभार, संजय कुंभार, राकेश कुंभार, प्रवीण कुंभार, गणेश कुंभार, विकास कुंभार, प्रशांत कुंभार, वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी युवा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कुंभार समाजाचे ग्रामस्थ उपस्थित होते.