Home राजकारण भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे! संजय...

भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे! संजय राऊत

123

संभाजीनगरमध्ये झालेल्या भयानक राड्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. हे सगळं सुरु असतांना संभाजीनगरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाकडून सावरकर सन्मान यात्रा काढली जात आहे. संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभेत गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. या सभेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “सभा शांततेत पार पडेल’ असं सूचक विधान केलं आहे.सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला. भाजपा म्हणतंय की गाय गोमाता आहे. सावरकरांना ते मान्य नव्हतं. गाय उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर तिचं गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपाला मान्य आहे का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. “उद्धव ठाकरे सभेला जाणार आहेत. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, स्थानिक नेते उपस्थित असतील. मविआची ही सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी करायची नाही. असं म्हणत खासदार संजय राऊतांनी आपण सभेला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. तसेच, “लोक प्रमुख नेत्यांचं भाषण ऐकतील. प्रचंड गर्दी होईल असं चित्र आहे. सभा शांततेत पार पडेल. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. असंही ते म्हणाले.