Home राजकारण भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे.

भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे.

111

राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिल्व्हर ओकवर बैठक संपन्न झाली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचा रोख अजित पवार यांच्या दिशेने तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील आजच्या ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे.