Home राजकारण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी!

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी!

98

२३ मे वार्ता: मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचा दाखवून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा प्रकार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन आमदार आशिष शेलारांना अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत चालला आहे. मोदी-शाह यांच्या द्वेषाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकातही काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव केल्याचे दुःख भाजपाला पचवता येत नाही. वर्षभरात महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका आहेत तसेच लोकसभा निवडणुकाही होत आहेत. या निवडणुकांतही भाजपाचा पराभव होणार या भीतीने ग्रासलेले भाजपातील आशिष शेलार सारखे नेते जनतेची माथी भडकवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना आधार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोहत्येची चित्रफीत दाखवताना आशिष शेलार यांनी त्यांची खातरजमा करायला हवी होती. पण तसे न करता त्यांनी जाणीवपूर्वक ती चित्रफीत दाखवून जनतेमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण बनवण्याचा हीन प्रकार केला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.