Home राजकारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका;

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका;

68

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोग, भाजपा तसेच शिंदे गटावर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर शिवसैनिकांना संबोधित केले. हे भाषण त्यानी कारवर उभे राहून केले. याच मुद्द्याला घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांच्या फोटोंची कॉपी करण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचारांची कॉपी करा, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. “गेल्या अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी तुम्ही कधी घराबाहेर पडला नाहीत आणि आज कारच्या सनरूफचा आधार घेत मातोश्रीच्या बाहेर पडून भाषण करत आहात. पण बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांची कॉपी करा,” असे बावनकुळे म्हणाले आहेत.उद्धव ठाकरेंच्या भाषणाची बाळासाहेबांच्या भाषणाशी तुलना…उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. थेट कारमध्ये उभे राहात त्यांनी हे भाषण केल्यामुळे लोक या प्रसंगाची तुलना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका भाषणाशी करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील १९६९ साली कारवर उभे राहात जोरदार भाषण केले होते.कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत- केशव उपाध्येभाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. एका बाजूला कारच्या बोनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही त्यांनी ट्वीट केला आहे.