वेंगुर्ला प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून गेले दोन दिवस मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करण्यात येत आहे काही गावांमध्ये मतदारांना प्रत्येकी १००० ते ३००० अशा रकमेचे वाटप करताना काही जागृत मतदारांनी रंगेहात पकडले होते मात्र निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे पैसे वाटप करणारे भाजपचे कार्यकर्ते पळून गेले होते.
दिनांक ५ मे रोजी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वायंगणी गावात भाजपकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले होते या संदर्भात काही लोकांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक विभागाच्या अनास्थेमुळे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यातच काल भाजपकडून मिळालेले पैसे आज बँकेत भरण्यासाठी गेलेल्या खानोली येथील एका मतदाराला भाजपकडून पैसे घेणे महागात पडले आहे या मतदारास दोन मतासाठी पाचशे रुपयांच्या चार नोटा भाजप कार्यकर्त्याकडून देण्यात आल्या होत्या. सदर नोटा आज ती व्यक्ती बँकेत भरण्यासाठी गेल्यावर सदरील चारही नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. सदरील नोटा बनावट असल्याने आपल्यावर कारवाई होईल या भीतीने सदर मतदाराने बँक कॅशियर कडून चारही नोटा बघण्याच्या बहाण्याने परत घेऊन बँकेतून पळ काढला.
बँक कर्मचाऱ्यांने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आपणाला बँक कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात देतील म्हणून त्याने बँकेतून पळ काढला. सदर व्यक्तीने आणलेल्या चारही बनावट नोटा घेऊन निघून गेल्याने बँकेने त्याविरुद्ध कारवाई करण्याचे टाळले
दोन दिवसांपूर्वीच गुहागर तालुक्यात एका भाजप सरपंचाने चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा बँकेत भरल्या होत्या त्यावर गुन्हा नोंद झाला आहे. एकंदरीत भाजपकडून मतदारांना वाटण्यात येणारे पैसे हे खरे आहेत की बनवट आहेत अशी चर्चा लोकांमध्ये असून भाजपकडून मतदारांना वाटण्यात येणारे पैसे बँकेत भरायला जाण्यास लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.