Home क्राईम भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली...

भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली अटक….

252

५ ऑगस्ट वार्ता: शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला होता. संधी मिळताच आरोपी विशालने एका कोपऱ्यात तिला खेचत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थीनिने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची खून दाखवली. यावरून त्याला किती माज आहे, हे पोलिसांसमोर उघड झाले. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.