कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या १ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व मा.श्री कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फत गोदरेज फॅक्टरी कुडाळ एम. आय. डी. सी. येथील महिला कामगार करीता जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये फॅक्टरी मॅनेजर श्री दिपक पिंगाळे, एच आर. श्री. लालन चव्हाण, आयोजक श्री आग्नेल फर्नाडीस कोऑडीनेटर असोसीएशन एमआयडीसी कुडाळ यांचे उपस्थितीमध्ये सपोनि श्रीमती हिरेमठ, श्रीमती मिनाक्षी नाईक, सखी वन स्टॉप सेंटर, श्री. वाघाटे, कुडाळ पोलीस ठाणे सोबत पोहेकॉ ७०३ पाटील तसेच मपोहेकॉ १५१ खोपकर, मपोहेकॉ ९७७ सावंत यांनी उपस्थित महिला व पुरुषांना नविन कायदा, पोलीस हेल्पलाईन नं डायल ११२, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार बाबत मार्गदर्शन केले तसेच महिला कामगार यांना बडीकॉप या पोलीस कम्युनिटी मार्फत चालणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती पुरविण्यात आली. सदर कार्यक्रमास १२०-१३० महिला व पुरुष कर्मचारी वर्ग उपस्थित होते.