Home स्टोरी भराडी देवी सेवा मंडळ दिवा (ठाणे) यांच्या वतीने पंढरपूर वारकरी यांच्या सेवेसाठी...

भराडी देवी सेवा मंडळ दिवा (ठाणे) यांच्या वतीने पंढरपूर वारकरी यांच्या सेवेसाठी चहा बिस्किट वाटप….

406

मसुरे प्रतिनिधी: सध्याच्या धावत्या जगामध्ये आपण वारीसाठी पंधरा ते वीस दिवस सर्व जण सुट्टी काढून वारीसाठी चालत जाऊ शकत नाही पण आपण आपल्या जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री रुपेश दुखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी पाऊल उचललं आणि जेजुरीच्या जवळ निरा या गावी सेवा करण्याचे निश्चित करून तो कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडला.यावेळी श्री रुपेश दुखंडे कृष्णा चौगुले, संभाजी कणसे, देवेंद्र चव्हाण, दिनेश बांबळे, अमोल दळवी, अरविंद घोगळे, महेश साटम, गिरीश ‌चिंदरकर इत्यादी सहकारी उपस्थित होते. यावेळी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने मोफत चहा बिस्कीट पाणी वाटप करण्यात आले आणि सर्व वारकऱ्यांना पुढील वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.