मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माता काशीबाई महादेव परब मेमोरियल ट्रस्ट ,मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे च्या तीन विद्यार्थ्यांना 2022-23 या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.धृती केशव भोगले (जिल्ह्यात 28 क्रमांक),मानस वासुदेव धारगळकर (जिल्ह्यात 36 वा) ,श्रिया श्रीराम परब (जिल्हात 60 वा क्रमांक).या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,सचिव अशोक मसुरेकर,संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले,मुख्याध्यापक किशोर देऊलकर तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.