मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माता काशीबाई महादेव परब चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे या प्रशालेचा दहावीचा निकाल १००% लागला आहे.
कु. विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (92.20%) , कु. वैष्णवी आत्माराम परब (89.00%). तर हृदया राजाराम पाटकर (83.20%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, तसेच संस्था पदाधिकारी डॉ. श्री अनिरुद्ध मेहेंदळे, श्री. अशोक मसुरेकर, श्री. बाबाजी भोगले, मुख्याध्यापक श्री. किशोर देऊलकर, यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य,पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.