Home स्टोरी भरतगड इंग्लिश मिडियमच्या विध्यार्थ्यांची ‘बांधावरची शेतीशाळा’!

भरतगड इंग्लिश मिडियमच्या विध्यार्थ्यांची ‘बांधावरची शेतीशाळा’!

173

 

 

मसुरे प्रतिनिधी: 

 

भारत देशाची अर्थव्यवस्था शेती वर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचे महत्व समजावतानाच, धान्य पिकवताना शेतकरी कोणते कष्ट घेतो याची जाणीव शालेय वयातच होण्यासाठी माता काशीबाई महादेव परब मेमोरियल ट्रस्ट मसूरे संचलित भरतगड इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बांधावरची शेतीशाळा हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. स्काऊट गाईड व व जलसुरक्षा या विषयांमधील उपक्रमा अंतर्गत प्रशालेच्या वतीने हा उपक्रम वेरली गावात राबविण्यात आला.

 

या उपक्रमामध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना भुईमुगाच्या लागवडी संदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांना भुईमूग शेती संदर्भात तज्ञ शेतकरी राघोजी परब यानी मार्गदर्शन केले. राघोजी परब, सावली राघोजी परब यांनी विद्यार्थ्यांना भुईमूग लागवडीची माहिती दिली.

ट्रीलर चालवण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सहभागी शिक्षक यांनी ट्रीलर चालविण्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शविला. जमीन मशागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भुईमुगाच्या बियाण्याची पारंपारिक पद्धतीने लागवड केली. यादरम्यान मुलांनी पेज भाकरी चटणी, कांदा घावणे आंबोळ्या अशा गावरान मेनूचा आस्वाद घेतला.

विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक केशव भोगले यांनी शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच शेती प्रात्यक्षिकांत दरम्यान भेडसावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केले. या संपूर्ण उपक्रमा अंतर्गत प्रशालाचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर , पार्वती कोदे , संतोषी मांजरेकर ,रेश्मा बोरकर आदी सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.