सावंतवाडी प्रतिनिधी: जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राहमणआळी शाळेने १००% निकालाची परंपरा कायम राखली. बसलेल्या १७ विद्यार्थ्यांपैकी १७ ही विदयार्थी उत्तीर्ण झाले असून ०६ विद्यार्थी मेडलधारक ठरले . ०४ विदयार्थ्यांनी सिल्व्हर मेडल व ०२ विदयार्थ्यानी ब्रॉझ .मेडल पटकावले.
पियुष अमित कोचरेकर (3री)- 94 गुण सिल्व्हर मेडल, हर्षदा चंद्रकांत राऊळ (3री) – 93 गुण सिल्व्हर मेडल, पार्थ सतिश राऊळ (3री)-92गुण – सिल्व्हर मेडल, श्रीश संतोष सामंत (3री) – 92 गुण – सिल्व्हर मेडल, दुर्गेश सावळाराम राऊळ (3री)- 84 गुण ब्राँझ मेडल, चैतन्य संदेश राऊळ (4थी)- 83 गुण – बाँझ मेडल पटकावले.
या परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री प्रसाद दळवी, सहकारी शिक्षिका श्रीम अर्चना तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. मळगाव गावचे सरपंच मा. श्री हनुमंत पेडणेकर, ग्रा.पं. सदस्या श्रीम. निकिता राऊळ, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके, आजगाव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रमोद पावसकर, मळगाव केंद्रप्रमुख श्री शिवाजी गावीत, शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. जगन्नाथ राणे उपाध्यक्षा श्रीम, मनस्वी परब, शिक्षणप्रेमी श्री. गोविंद राऊळ शि. पा .संघ उपाध्यक्ष श्री संतोष सामंत, मा. पा. संघ उपाध्यक्षा श्रीम साक्षी राऊळ व माजी अध्यक्ष शा.व्य. समिती राजेंद्र राऊळ व सर्व शा.व्य समिती सदस्य व ग्रामस्थ मळगाव ब्राह्मणआळी यांनी सर्व यशस्वी विदयार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.