Home स्टोरी ब्रेकिंग न्यूज: ‘रामलल्ला’च्या जयघोषात सहभागी व्हा, आणि श्रीरामाचा “गोल्ड कॉईन” जिंका…!

ब्रेकिंग न्यूज: ‘रामलल्ला’च्या जयघोषात सहभागी व्हा, आणि श्रीरामाचा “गोल्ड कॉईन” जिंका…!

102

ओंकार कलामंचाचे आयोजन; सुवर्णकार पी.एस.चोडणकराकडून स्पर्धा पुरस्कृत.

 

सावंतवाडी,ता.२२: ओंकार कलामंचाच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमात डिजेच्या तालावर भगवा आणि पारंपारीक पध्दतीने नृत्य करणार्‍या एकाला गोल्ड कॉईन जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. ओंकार कलामंच आणि पी. एस. चोडणकर ज्वेलर्सचे सुवर्णकार पावन चोडणकर यांच्या माध्यमातून हे अनोखे बक्षीस पुरस्कृत करण्यात आले आहे. याचे वितरण संबंधिताला कार्यक्रमाच्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे.

अयोध्या सोहळ्याचे औचित्य साधून ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाला अवघ्या काही वेळात सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून फटाक्याची आतषबाजी, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दीपोत्सव, वेशभुषा स्पर्धा आणि रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता चोडणकर यांच्या माध्यमातून हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त युवकांनी या जल्लोषात सहभागी व्हावे, तसेच पांढरे किंवा भगवी वस्त्रे परिधान करुन आपले सादरीकरण करावे, असे आवाहन मंचाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.