Home स्टोरी ब्रेकिंग न्यूज: मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा!

ब्रेकिंग न्यूज: मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा!

221

४ ऑगस्ट वार्ता: दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत ATS ने महाराष्ट्रातून अटक केली आहे. या अटक केलेल्या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचंही तपासात उघड झालं आहे. या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा १५ ऑगस्ट रोजी देशात दहशतवाद्या कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचं उघड झालं आहे. मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शाहनवाज आलम अशी या दहशतवाद्यांनी नावे आहेत.

महाराष्ट्र ATS ने नुकतेच अटक करण्यात आलेल्या झुल्फिकार अली बरोडावाला त्यांच्या टार्गेटनुसार मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता का? याचा तपास करत आहेत. एटीएसने अलीकडेच झुल्फिकार अली बडोदावाला याला ताब्यात घेतले होते, ज्याला एनआयएने ISIS मॉड्यूलशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात अटक केली होती. ISIS आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले होते. अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. या संघटनेचे मुख्य लक्ष्य आरएसएसचे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलंय. एक दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारने बंदी घातली होती.

मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन १५ ऑगस्ट रोजी घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात मोठा विध्वंसक हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे.