Home Uncategorized ब्रेकिंग न्यूज!अजितदादांचा पत्ता कट?

ब्रेकिंग न्यूज!अजितदादांचा पत्ता कट?

121

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राजकीय जीवनातून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवारांच्या निर्णयाने राष्ट्रवादीमध्ये भूकंप आला तर महाराष्ट्राच्या राजकारणातही काहूर माजले आहे. पवारांनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र पवारांच्या स्वभावानुसार ते त्यांचा निर्णय फिरवण्याची शक्यता कमीच आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बोलण्यानुसार नवा अध्यक्ष हा पवारांच्या मार्गदर्शनात तयार होईल. तो कुठे चुकला तर पवार त्याला दुरूस्त करतील, यावरुन राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार, हे नक्की आहे. तो अध्यक्ष आता अजितदादा असणार की सुप्रियाताई, एवढेच आता ठरायचे आहे.

सुप्रियाताई या पवारांच्या राजकीय वारस आहेत. पवारांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे की, सुप्रियाताई यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे आणि त्या राज्याच्या राजकारणात येणार नाही. तीन टर्म त्या लोकसभेच्या खासदार आहेत. दिल्लीतील राजकारणात त्यांना अधिक रस आहे, त्यामुळे सुप्रियाताई यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे त्या पवारांच्या कायम सोबत असतात. कोणताही सल्ला घ्यायचा असले, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर मुलगी म्हणून पवारांचा सल्ला घेण्यात त्यांना कोणतीही अडकाठी किंवा कोणताही कमीपणाही येणार नाही. पक्षातील अनेक नेत्यांनाही सुप्रियाताई यांच्या नावाला नकार देता येणार नाही