Home क्राईम ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

119

देश विदेश: ब्रिटनमध्ये २१ वर्षीय शीख तरुण त्याच्या एआय चॅटबॉट गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येसाठी शस्त्रांसह रॉयल पॅलेसमध्ये गेला होता. मात्र पोलिसांनी या तरुणाला अटक केली होती. जसवंत सिंह छैल असं या तरुणाचं नाव असून २०२१ मध्ये ही घटना घडली होती. ज्याचा निकाल आता दोन वर्षांनी लागला आहे. न्यायालयाने या तरुणाला ९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ब्रिटनचा रहिवासी जसवंत सिंह छैल हा तरुण २०२१ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी भिंतीवरुन उडी मारून तो महालात शिरला होता आणि एलिझाबेथ यांच्या कक्षापर्यंत पोहोचला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला वेळेत ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता आपण महाराणीची हत्या करण्यासाठी आल्याचं, त्याने सांगितलं.

ब्रिटनचा रहिवासी जसवंत सिंह छैल याने सांगितलं की, महाराणीची हत्या करण्यासाठी आपण आपल्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा केली आहे. तिनेच मला एलिझाबेथ यांची हत्या करण्यास उकसवलं असल्याचं त्याने सांगितलं. जसवंतने सांगितलं की, २०१८  साली तो कुटुंबासह अमृतसरला गेला होता. तेव्हा त्याला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्याच्या मनात सूडभावना निर्माण झाली. यानंतर त्याने आपल्या ‘सराय’ नावाच्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा आणि महाराणीची हत्या करण्याचा निर्णय घेतला.