Home स्टोरी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा...

बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

164

सावंतवाडी:                                                घावनळे येथील तुकाराम म्हापणकर गेले चार-पाच दिवस सावंतवाडी शहरांमध्ये निराधार अवस्थेत भटकत होते. पोटाला अन्न पाणी नसल्याकारणाने ते काल रात्री जिमखाना जवळ पेशुद्ध अवस्थेत पडले होते. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याची कल्पना सामाजिक बांधिलकी देताच रात्री ११ वाजता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व शेखर सुभेदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर वृद्ध व्यक्तीला स्वच्छ करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे .यासाठी पोलीस बीट हवालदार प्रसाद कदम, गणेश खोरागडे, लखन पाटील व साहिल खरागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत.