Home राजकारण बेरोजगार तरुणांसाठी छत्तीसगड राज्य सरकारचा एक मोठा निर्णय….

बेरोजगार तरुणांसाठी छत्तीसगड राज्य सरकारचा एक मोठा निर्णय….

95

केंद्रासह विविध राज्य सरकारंकडून नोकऱ्यांच्या घोषणाही होत आहेत. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून परदेशाप्रमाणे भारतातही शिक्षण असूनही नोकरी न मिळालेल्या तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची मागणी सतत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता छत्तीसगड राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड राज्यामध्ये बेरोजगार तरुणांना महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता मिळणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्याचा २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करताना बेरोजगारी भत्ता देण्याबाबत घोषणा केली आहे. यानुसार १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुणांना हा भत्ता मिळणार आहे. ज्या तरुणांच्या घरातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असेच युवक या भत्त्यासाठी पात्र असणार आहे.मुख्यमंत्री बघेल यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ केली आहे. यानुसार अंगणवाडी सेविकांचं मानधन ६,५०० वरून १०,००० रुपये करण्यात आलं. तसेच अंगणवाडी मदतनीसांचं मानधन ३,५५० वरून ५,००० रुपये करण्यात आलं आहे.