Home स्टोरी बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा शाखेस २१ हजारांची देणगी! कणकवलीच्या महिला मंडळाचा...

बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा शाखेस २१ हजारांची देणगी! कणकवलीच्या महिला मंडळाचा स्थूत्य उपक्रम.

64

मसूरे प्रतिनिधी: कणकवली येथील नाडकर्णीनगर, कलमठ व समर्थ नगर महिला मंडळ आशिये या महिला मंडळ सदस्यांनी सार्वजनिक हळदीकुंकू समारंभातुन उरलेली २१ हजार रुपयांची रक्कम बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेस सुपूर्द केली.

गेली १६ वर्ष हा उपक्रम राबविला जात असून या समारंभातून शिल्लक राहिलेली रक्कम एखाद्या सामाजिक सांस्कृतिक संस्थेला देणगी म्हणून दिली जाते.एका सुंदर कार्यक्रमात उपस्थित राहून महिला मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत ही देणगी स्विकारताना खूप आनंद झाला असे दीपक भोगटे म्हणाले.

प्रसाद घाणेकर यानी सेवांगणच्या शैक्षणिक उपक्रमांचे खूप कौतुक केले.सेवांगणच्या उपक्रमाची उपस्थित महिलाना माहिती दिली. सेवांगणचे विश्वस्थ दीपक भोगटे यांनी आभार मानले