Home स्टोरी बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे संविधान दिन साजरा….!

बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे संविधान दिन साजरा….!

129

मसुरे प्रतिनिधी:

 

बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा शाखेत संविधान दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी मनोज काळसेकर यानी संविधान दिनाचे महत्व सांगितले. भारताचे संविधान लिखीत स्वरूपात असून जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधानाचे हस्तलिखीत सुद्धा उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे योगदान संविधान निर्मितीत आहे हेही त्यानी विषद केले.

दीपक भोगटे यानी भारताच्या संविधानाने सर्वाना समान पातळीवर आणले असून एकतेचा संदेश संविधान देते. भारताची अखंडता टिकवण्यासाठी सर्वानीच संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच संविधान जागृतीसाठी कार्यरत राहाणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

यावेळी सवांनी सामुदायिकरित्या संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. विद्यार्थ्याना व पालकाना नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलना वरील पुस्तके भेट देण्यात आली.

या कार्यक्रमास किशोर शिरोडकर,चौके हायस्कूलच्या मुख्यापिका रसिका गोसावी, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, अनुष्का चव्हाण, सुप्रिया आळवे, सुलक्षणा दळवी, निधी आळवे, गोपाळ परब,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.