सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ४ ऑगस्टला सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी सागर साळुंखे, संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, अध्यक्ष रवींद्र मडगावकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेत जिल्हाभरातून स्पर्धकांनी नावे नोंदणी केली आहे. एक ते पाच वयोगटात, पाच ते आठ व आठ ते बारा अशा वयोगटातील स्पर्धा आहे. ज्याना सहभाग घ्यायचा आहे,त्यांनी आपली नावे बेबी वर्ड्स सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल येथे द्यावी. तर कार्यक्रम स्थळी ही येऊन नावे देऊ शकता. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे..