Home स्टोरी बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आरवली येथे श्री देव वेतोबा चरणी लीन…!

बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आरवली येथे श्री देव वेतोबा चरणी लीन…!

149

वेंगुर्ले: बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सपत्नीक कोकणचा तिरुपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरी चे दर्शन घेतले.

राज्यपाल श्री. आर्लेकर हे मूळ आरवली येथील रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वास्तव्य गोवा राज्यात असते. श्री देव वेतोबाच्या वार्षिक जत्रोत्सवात येण्यास न मिळाल्याने आज त्यांनी कुटुंबासमवेत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले.

यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच देवस्थान कार्यालयात त्यांचा देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ प्रसाद प्रभू साळगावकर, मयूर आरोलकर उमेश मेस्त्री, उत्तम चव्हाण व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.