बजेट २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. निधी मंजूर.
मालवण: मालवण तालुक्यातील बिळवस प्रजीमा ३२ ते बिळवस सातेरी मंदिर जाणारा ग्रा.मा. २६९ या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी आ. वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. मंजूर केले आहेत. मात्र शिंदे- फडणवीस सरकारने या कामाला स्थगिती दिली होती.न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने हि स्थगिती उठविली आहे. त्यामुळे या कामाला आता सुरुवात होत असून आ. वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. काम मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,पंकज वर्दम,अमित भोगले,विभागप्रमुख राजेश गांवकर, समीर लब्दे, विजय पालव, पराग नार्वेकर, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखा प्रमुख रामचंद्र पालव,उप शाखाप्रमुख रमेश फणसे, मोहन पालव, सुबोध पालव, भाई पालव, रमेश पालव, भाई माधव, विकास सावंत, अबा पालव, ग्रा.पं. सदस्य प्रकाश फणसे, भावेश पालव, अनु पालव, बाळू माधव, पंडी पालव, अशोक पालव, पपू पालव, संदीप पालव, संतोष पालव, राजू पालव, बाबू रेडकर, समीर पालव, सचिन पालव, सुधीर पालव, उदय पालव, गोपाळ पालव, संतोष पालव, चंदू पाताडे, बाळा नाईक, संकेत पालव, सुबोध फणसे, सुजित पालव, रोहित सावंत,अशोक जनार्दन पालव, आदित्य सावंत,राष्ट्रपती पालव, चेतन पालव, बबन नाईक, ओमकार राणे, अंकल पालव, दाजी गावडे, संभाजी पालव, भास्कर पालव, कमलाकर पालव, सचिन पालव, ज्ञानेश फणसे, रितेश फणसे, सत्यवान पालव, आपू पालव, अर्थव पालव, प्रवीण फणसे, युवराज पालव, सुरेश पालव, परशुराम फणसे, गुरू फणसे, एकनाथ राणे, अरुण पालव, शार्दुल पालव यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.