Home स्टोरी बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन!

बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन!

190

मालवण (मसुरे प्रतिनिधी): 

 

बिळवस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बिळवस वरचावाडा येथील श्री भाई माधव यांच्या घरानजीक रस्ता खचल्याने नागरिकांना गैरसोईचे ठरले होते. सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने प्राधान्याने विकास काम मंजूर करून गणेश चतुर्थी पूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच सौ मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यामुळे ग्रामस्थान मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ग्रा सदस्य संतोष पालव, प्रकाश फणसे, सौ रंजना पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, आबा पालव, प्रशांत पालव, आनंद पालव, पंढरीनाथ पालव, सिद्धेश पालव, भूषण पालव, रोशन पालव, सुहास माधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.