Home Uncategorized बिळवसच्या समृद्धी पालव च्या चंद्रा लावणी नृत्याची रशियाला भुरळ….!

बिळवसच्या समृद्धी पालव च्या चंद्रा लावणी नृत्याची रशियाला भुरळ….!

291

रशिया मध्ये मराठमोळ्या लावणी नृत्याला पुन्हा पुन्हा वन्स मोअर, शिट्ट्या आणि टाळ्या….!

 

मसुरे प्रतिनिधी: 

 

लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणून सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावणी गीत म्हणजेच लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते. लावणी ने आजपर्यंत फड,तमाशा,नाटक, मराठी सिनेमा, आपली संस्कृती यावरती अधिराज्य गाजवले आहे. परंतु याच मराठमोळ्या लावणीने रशिया मध्ये सुद्धा तेथील लोकांना भुरळ घातली. निमित्त होते मालवण तालुक्यातील बिळवस गावातील समृद्धी पालव या मुलीने सादर केलेल्या लावणी नृत्यने रशियामधील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि तेथील ग्रामस्थांना ताल धरायला लावला. याच लावणी नृत्याने येथील सभागृह सुद्धा थिरकला.अहो एवढेच नव्हे तर पुन्हा पुन्हा वन्स मोअर आणि शिट्ट्यांनी सुद्धा आरा आसमंत दुमदुमून गेला. यातच आपल्या मराठमोळ्या लावणीने आणि ती सादर करणाऱ्या बिळवस गावच्या समृद्धी पालव या युवतीने रशियन ग्रामस्थांची मने जिंकली.

भारत देशा प्रमाणेच रशियामध्ये दिवाळी सेलिब्रेशन होत नसते. रशियामध्ये न्यू इयर फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रशिया मध्ये इझेव्हस्क स्टेट मेडिकल अकादमी हे प्रसिद्ध असे वैद्यकीय कॉलेज आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये विविध देशातील विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. याच कॉलेजमध्ये भारतातूनही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गेलेले आहेत. यामध्येच मालवण तालुक्यातील बिळवस या गावची समृद्धी पालव ही कन्या सुद्धा शिक्षण घेत आहे. यावर्षी या मराठी कल्चर्सच्या मुलींनी आपल्या डीन कडे दिवाळी फेस्टिवल साजरा करण्याची विनंती केली आणि या कॉलेजच्या डीन दिमित्री ओप्लोविन्स्की यांनी ही विनंती मान्य करून दिवाळी फेस्टिवल साजरा करण्याचे ठरविण्यात आले. याचेच अवचित्य साधून समृद्धी पालव हिने आपल्या सह कारी मुली मुलांना घेऊन काही लावणी गीते कोरिओग्राफ करून ती या फेस्टिवल मध्ये सादर केली. सर्व विद्यार्थ्यांबरोबर लावणी नृत्य सादर करताना समृद्धी पालव हिने स्वतः सादर केलेल्या ” चंद्रा ” या लावणी नृत्याने संपूर्ण सभागृह या लावणीच्या ठेक्यावर थीरकायला लावला. या कॉलेजचे प्रत्यक्ष डीन याना सुद्धा या लावणीची भुरळ पडली. त्यानी सुद्धा काही क्षण या लावणीवर ठेका धरला. वन्स मोर, टाळ्या आणि शिट्ट्या यांचा तर यावेळी पाऊसच पडला. यातच आपल्या मराठमोळ्या लावणीने आणि समृद्धी पालवने रशियातील रसिकांची मन जिंकल्याचे समोर आले. जेव्हा रशिया सारख्या देशांमध्ये आपल्या मराठमोळ्या लावणीने येथील रसिकांची आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्व देशातील मुलांची मन जिंकली जातात यावेळी ही लावणी सादर करणाऱ्या समृद्धी पालवचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना आपली मराठी संस्कृती रशियामध्ये सुद्धा त्याच ताकदीने सादर करताना समृद्धी पालव बाबत प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने भरून आले तर नवल नाही.

समृद्धी पालव ही मालवण तालुक्यातील बिळवस गावची कन्या असून तिची सध्या मुंबई मुलुंड येथे वास्तव्यास असणाऱ्या समृद्धी हिची आई मधुरा पालव आणि वडील मंगेश पालव यांचे समृद्धी हिला तेवढेच मोठे सहकार्य आहे. अगदी लहान वयापासून समृद्धीच्या आवडी निवडी जपून तिच्या आई-वडिलांनी समृद्धी हिला डॉक्टर होण्यासाठी रशियामध्ये शिक्षणासाठी पाठविले आहे. भविष्यात समृद्धी ही निश्चितच डॉक्टर होईल यात शंका नाही. परंतु आज तिने भारतीय आणि महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रापार नेऊन तिने जे यश मिळवले आहे याबाबत निश्चितच प्रत्येक भारतीयाचा आणि कोकण वासियांचा उर भरून आलेला आहे. या दिवाळी फेस्टिवल मध्ये सादर केलेल्या अनेक लावणी नृत्यांना या कॉलेजच्या मुख्य डीन दिमित्री ओप्लोविन्स्की यांनी विशेष कौतुक करून भारतीय आणि महाराष्ट्राच्या या संस्कृतीचे सुद्धा विशेष कौतुक केले आहे.