मसुरे प्रतिनिधी: माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत ३०० पैकी २९६ गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत साठी ती पात्र ठरली आहे.राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत हर्षिता हिने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. हर्षिता ही बिळवस ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव यांची कन्या आहे. तिच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.