१३ जून वार्ता: बिपरजॉय चक्रीवादळामुळे धोका वाढत आहे. या अतितीव्र झालेल्या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर पडणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झाले आहे. दरम्यान गुजरातमधील चक्रीवादळाचा प्रभाव पडणाऱ्या काही भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती गुजरात सरकारकडून देण्यात आली आहे. तर या चक्रीवादळामुळे गुजरातच्या 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये 10 किमीच्या परिसरातली गावं खाली करण्यात आली आहेत. कच्छमध्ये कलम 144 लावण्यात आलंय. तीन दिवसांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत.