Home राजकारण बारावीच्या पेपरफुटीवरुन सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका…..

बारावीच्या पेपरफुटीवरुन सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका…..

60

चाळीस डोके आणि पन्नास खोके’ सरकारचा संबंध डोक्याशी कमी, खोक्यांशी जास्त. अशा शब्दात पेपरफुटीवरुन आजच्या सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. कुचकामी सरकार, कोणतंही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री महाराष्ट्राच्या नशिबी असल्यानं राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही फुटलेत, अशी टीका आजच्या सामना मुखपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तर बारावी पेपरफुटीचं प्रकरणही राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार का? असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला आहे. तसेच, चाळीस डोके, पन्नास खोके सरकारचाही संबंध डोक्याशी कमी आणि खोक्यांशी जास्त आहे. अशी खोचक टीका शिंदे गटावर केली आहे.”लोकसेवा आयोगाचे प्रकरण आपण पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवू,’ असे ‘बुद्धिमान’ वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. तसे बारावी पेपरफुटीचे प्रकरणही ते पुढील निर्णयासाठी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत काय? महाराष्ट्रात एकापाठोपाठ सगळेच पेपर व निकाल फुटताना दिसत आहेत. याआधी स्पर्धा परीक्षांचे, म्हाडाच्या परीक्षांचेही पेपर फुटले. बारावीचा रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर फुटला व पाठोपाठ गणिताचा पेपर फुटला. हे कसले लक्षण मानायचे? केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खासगी क्लास चालकास अटक केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीमागे खासगी क्लासचे चालक आहेत, असे सांगितले जात असले तरी इतकी गोपनीयता, सुरक्षा व्यवस्था ठेवूनही पेपर परीक्षेआधी फुटतात हे धक्कादायक आहे. पण महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून कोणत्याही परीक्षेशिवाय बेकायदेशीरपणे ‘पास’ होण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे. असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.