Home राजकारण बारामतीत भावजय विरुद्ध नणंद अशी लढत होणार…!

बारामतीत भावजय विरुद्ध नणंद अशी लढत होणार…!

194

बारामती: बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत भावजय विरुद्ध नणंद अशी लढत होणार आहे.  सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पदमसिंह पाटील हे माजी मंत्री आहेत, तर त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत.

यापूर्वी अजित पवार यांनी बारामतीत बोलताना मतदारांना भावनिक आवाहन केले होते. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांनी वेढलेला उमेदवार निवडून द्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी १९९१, १९९५, १९९९, ३००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशी सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यामुळे बारामतीत चुरशीचा लढत होणार आहे.