कुडाळ: कुडाळ येथे शिवप्रेमी सिंधुदुर्ग, राष्ट्रप्रेमी नागरिक मंच आणि समस्त शिव – शंभू प्रेमीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा करण्या आला निषेध._’औरंगजेब देशाचा आदर्श आहे’ अशा प्रकारचे चुकीचे विधान करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा निषेध कुडाळ येथील जिजामाता चौकात शिवप्रेमी सिंधुदुर्ग, राष्ट्रप्रेमी नागरिक मंच आणि समस्त शिव-शंभू प्रेमींच्या वतीने प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना प्रबोधन करताना राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे श्री. विवेक पंडित म्हणाले की, आमच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप आदर आहे. परंतु त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे ते करत असलेल्या विधानांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे नाव बदनाम करत आहेत.औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूरमध्ये लोक भडकले आणि दंगल उसळली. हे माहीत असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर जी विधान करत आहेत, त्यामुळे त्यांना देशांमध्ये अशांतता निर्माण करायची आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने प्रकाश आंबेडकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. पंडित यांनी केली.
यावेळी सर्वश्री मिलिंद देसाई, विवेक पंडित, राम राणे, गुरुदत्त तावडे, गुरुप्रसाद प्रभू, समीर सरफदार, चैतन्य कुडाळकर, सागर वालावलकर, शिवम म्हडेश्वर, सिद्धेश सावंत, महेश अडसूळ, उदय आईर, जितेंद्र प्रभू, समीर बिबवणेकर, ओमकार मंडोलकर, ओमकार वाळके, सुदर्शन मोबारकर, गणेश कोळेकर, दैवेश रेडकर, केशव माडये, साईप्रसाद मसगे,रमाकांत नाईक, गुरुदास प्रभू आदी उपस्थीत होते. आंदोलनाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.