Home स्टोरी बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी!

बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी!

130

सावंतवाडी: बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्री विठुरायाचे दर्शऩ घेतले.मंदिरात पहाटे पाच वाजता काकडआरतीने मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात हा सोहळा आरंभ झाला. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी वाजतगाजत उत्सवमुर्तीचे आगमन झाले. या सोहळ्यानिमित्त अनेक वर्षांची परंपरा असलेल्या निगुडे येथिल दिंडी सह निमजगा दिंडी ,ऱामभरोसे मंडळ देऊळवाडा दिंडी ,उभाबाजार दिंडी,त्याचप्रमाणेनाबर स्कूल बांदा व जि.प. केंद्रशाळा बांदा,तसेच तोरसे येथिल महिलांची दिंडी अशा अनेक दिंड्या मंदिरात येतात. आलेल्या सर्व दिंड्यांचे मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले. सात वाजता सायंआरती झाली. प्रतिवर्षाप्रमाणे रात्री श्रींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई कऱण्यात आली होती.