सावंतवाडी प्रतिनिधी: बांदा शहरा नजीकच्या गावातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरी निमित्त गोवा येथे जाणारे युवक -युवती, वृद्ध यांना कमी वेळेत जाता यावे यासाठी सदर एसटी बस सुरू करणे गरजेचे आहे.
सदर रस्ता पूर्ण होऊन कित्येक वर्षे झाली असून या मार्गावर कुठचीही एसटी सेवा सुरू नाही आहे. अजूनही येथील सामान्य नागरिक, विद्यार्थी युवक-युवती एसटी बसच्या प्रतीक्षेत आहेत. यानिमित्ताने शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरीनिमित्त गोवा येथे जाणारे युवक-युवती तसेच गावातील नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी खूप सोयीस्कर होईल.
सदर एसटी बस सुरू करण्यासाठी जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया अध्यक्ष श्री. केतनकुमार गावडे, सावंतवाडी तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष श्री.संजय लाड, तालुका काँग्रेस पदाधिकारी श्री.भाऊसाहेब देसाई तसेच तांबुळी मधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व आसपासच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने बांदा-डेगवे-तांबुळी-असनिये मार्गे घारपी एसटी बस सेवा सुरु करावी यासाठी सावंतवाडी आगरप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.